बँकेचा इतिहास

दिनांक ०१/०५/१९८१ रोजी औरंगाबाद जिल्याचे विभाजन होऊन जालना, अंबड, भोकरदन व जाफ्राबाद या चार तालुक्यांचा मिळून "जालना" जिल्हा निर्माण करण्यात आला. त्यानुसार "जालना" जिल्ह्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दि ०१/०७/१९८३ रोजी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभाजन होऊन जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निर्मिती करण्यात आली. सन १९८८ मध्ये परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने परभणी जिल्यातील परतूर तालुका बँकेकडे वर्ग करण्यात आला. सन १९९२ मध्ये शासनाने जालना जिल्यात घनसांगवी, बदनापूर व मंठा तालुक्याची निर्मिती केल्याने जिल्या अन्तर्गत एकूण ०८ जिल्हे आहेत.


जालना जिल्यातील जालना तालुका १०, बदनापूर तालुका ०५, अंबड तालुका ११, घनसांगवी तालुका ०८, भोकरदन तालुका १३, जाफ्राबाद तालुका ०६, परतूर तालुका ०७ व मंठा तालुका ०४ याप्रमाणे बँकेच्या किल्यात एकूण ६४ शाखा असून जालना येथे बँकेचे मुख्यालय कार्यरत आहे.


बँकेत सन २०१४ पासून कोअर बँकिंग सोल्युशन संगणकीय प्रणाली कार्यरत आहे.